अवैध खनिज उत्खनन, ओव्हरलोड वाहतुकीविरोधात बसपाचा एल्गार

0

सुनील बोर्डे, वणी: अवैध गौण खनिज उत्खनन व ओव्हरलोड वाहतूकीवर कार्यवाही करण्याबाबत बसपातर्फे निवेदन देण्यात आले आहे. वणी, झरी मारेगाव परिसरात राष्ट्रीय गौण खनिज संपत्ती (डोलोमाईट) मोठ्या प्रमाणात आहेत. या खनिज संपत्तीचे संगोपन करण्याची जबाबदारी ही येथील महसूल प्रशासनाची आहे. परंतु या बाबीकडे प्रशासनचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय संपत्तीचा मोठ्या प्रमाणात उपसा व उत्खनन होत आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्यासाठी बसपातर्फे तहसिलदारांना  निवेदन देण्यात आले आहे.

अवैध उत्खननासोबतच परिसरात ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. या वाहतुकीसाठी तब्बल 35 ते 40 किलोमीटरची राष्ट्रीय महामार्गाने ओव्हरलोड वाहतूक होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनानं गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. जर प्रशासनाने योग्य ते पाऊल उचललं नाही तर बसपातर्फे याविरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदन देते वेळी बसपाचे जिल्हा प्रभारी प्रवीण खानझोडे, विधानसभा अध्यक्ष बबलू मेश्राम, युवा नेते ऍड राहुल खापर्डे, मारेगाव गोवारी समाज भाईचारा समितीचे माधव कोहळे, निंबाळा गावाचे अध्यक्ष सुभाष लसंते, राजूर सेक्टर अध्यक्ष प्रशांत डांगरे, उत्तर भारतीय वणीचे अध्यक्ष मुसफिर राम व बसप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.