झरी तालुक्यात हातभट्टीच्या दारूचा महापूर

विषारी दारूमुळे आरोग्य धोक्यात

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या अनेक महिन्यापासून अवैद्य देशी दारूची विक्री व तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असतांना त्यात अजून हातभट्टीच्या विषारी दारूची भर पडली आहे. ज्यामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्य व जीवनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.

तालुक्यात १०६ गावे असून आदिवासी समाजाचे पोड मोठ्या प्रमाणात आहे. कमी पैशात मोहफुलाची दारू मिळत असल्याने पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोरगरिबांच्या व्यतिरीक्त चांगल्या घराण्यातील तरुण तसेच कर्मचारी अधिकारी सुद्धा पहिल्या धारेची म्हणून ५ लिटर चे कॅन भरून पार्टी करीता तसेच पिण्याकरिता घेऊन जातात.

मोहफुलाची दारू बनविण्याकरिता मोह सडवून त्यात युरिया, गुळ तर कुणी पाल सुद्धा यात नशेकरीता टाकतात अशी माहिती आहे. ज्यामुळे मानवाच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोहफुला पासून विनापरवाना दारू काढण्यावर बंदी आहे. परंतु अबकारी व पोलीस विभागांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची हातभट्टी लावून विषारी दारू काढणे सुरू आहे. असा आरोप आहे. अबकारी व पोलीस विभाग मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. आधीच तालुक्यात देशी दारूच्या व्यसनामुळे शेकडो तरुणापासून वयोवृध्दपर्यंत लोकांनी आपले जीव गमावले त्यात हातभट्टीची विषारी दारू काढून पीत असल्याने जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

तालुक्यात बंदी वाढोना, गोडगाव ईसाजन, बेलमपेलली, कारेगाव, मारोती पोड ( लालगुडा), पचपोहर, शिबला, मजरा, पार्डी ( पचपोहर), मुच्छी, मांडवी, मांडवा या गावात हातभट्टीची दारू काढून विक्री केल्या जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बाबत अबकारी व पोलीस विभागांना याबाबत माहिती असून कोणतीही कार्यवाही केली जात नाही आहे असा सर्वसामान्यांचा आरोप आहे. ज्यामुळे संशय व्यक्त केल्या जात आहे.

विषारी दारू तयार करणे तसेच विकणे सर्वात मोठा गुन्हा असून आय पी सी कलम ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करून कार्यवाही केल्यास हातभट्टी मधील विषारी दारू तयार करण्यावर व विक्रीवर आळा बसेल. परंतु दोन्ही खात्याच्या आर्थिक व मधुर समंध या हातभट्टी दारू बनविणाऱ्या व विक्रेत्यांसी असल्यामुळे कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बॉबी कडे लक्ष देऊन विषारी दारू विक्रेत्यावर कार्यवाही करावी व जनतेच्या जीवन वाचवावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.