रंगनाथ स्वामी पथसंस्थेच्या नवीन शाखेचे रविवारी उद्घाटन

राम शेवाळकर परिसरात सुरू होत आहे ग्रामीण शाखा

0

जब्बार चीनी, वणी: शहरातील अग्रगण्य असलेली पथसंस्था श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या  ग्रामीण शाखेचे शहरातील राम शेवाळकर परिसरात रविवारी उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार आहे. तर पथसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे हे स्वागताध्यक्ष राहणार आहे. वणी, मारेगाव, मुकुटबन, घाटंजी, यवतमाळ, आर्णी, वरोरा, गडचांदूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजूरा, भद्रावती, चिमूर, मुल इथे शाखा असून आता वणी शहरात पतसंस्थेची ग्रामीण शाखा सुरू होत आहे.

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर माजी आमदार वामनराव कासावार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राजूदास जाधव, टीकाराम कोंगरे, संजय देरकर, वसंतराव घुईखेडकर हे प्रमुख पाहुणे राहणार आहे. रविवारी दुपारी 2 वाजता राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

पथसंस्थेचे संचालक मंडळ विवेकानंद मांडवकर, सुधीर दामले, पांडुरंग प्रेमलवार, सुरेश बरडे, रमेश भोंगळे, जय आबड, परिक्षीत एकरे, चिंतामणी आगलावे, भुपाळराव पिंपळशेंडे, पुरुषोत्तम बद्दमवार, राजेंद्र गडीय़ा, उदय रायपुरे, ऍड घनश्याम निखाडे, छाया ठाकुरवार, निमा जिवणे व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश तांबेकर यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी व दैनिक अभिकर्ते परिश्रम घेत आहे.

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ही केवळ यवतमाळ जिल्ह्यातीलच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातीलही एक अग्रगण्य पतसंस्था आहे. सतत अ गटात ऑडीट असलेल्या या पतसंस्थेत 52 हजारांपेक्षाही अधिक सभासद आहे. पथसंस्थेचे वसुल भागभांडवल सुमारे 30 कोटींचे आहे. पथसंस्थेत 640 कोटी पेक्षा अधिक रकमेच्या ठेवी आहे तर 317 कोटी पेक्षा अधिक रकमेचे पतसंस्थेकडून कर्जवितरण करण्यात आले आहे. पतसंस्थेत 255.44 लाखांची गुंतवणूक असून 1 कोटी 14 लाखांचा नफा आहे. तर 660 कोटींचे पतसंस्थेचे खेळते भांडवल आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.