मजुरांची मुजरी नाही त्यातच कामही बंद

नेरडवासियांचे थकीत मजुरीसाठी बेमुदत उपोषण

0

विवेक तोटेवार, वणी:  2018 ते 20 दरम्यान रोजगार हमी योजनेत काम केल्याची मजुरी अद्याप मिळाली नाही. मजुरांची थकीत असलेली मजुरी तात्काळ मिळावी या मागणीसाठी नेरडवासी सोमवारी 5 ऑक्टोबर पासून वणीच्या पंचायत समिती कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.

वणी तालुक्यांअतर्गत येणाऱ्या नेरड (पुरड) येथे 2016 पासून रोजगार हमी योजने अंतर्गत पांदण रस्ते, विहीर, शेततळे, शोष खड्डे असे अनेक कामे केली गेली. त्यानंतर वृक्ष लागवड व संगोपन यांचेही काम सुरू होते. 2018 ते 2020 या कालावधीत झालेल्या कामाचे पैसे अद्यापही मिळाले नाही सोबतच कामही बंद झाले आहे. काम मिळण्याकरिता व मजुरीचे पैसे मिळण्याकरिता नेरड ग्रामवासीयांनी अनेकदा निवेदने व तोंडी मागणी केली. परंतु केलेल्या कामाची अद्यापही मजुरी मिळाली नाही.

ही मागणी आता शासन दरबारी जावी व मेहनतीचे पैसे मिळावे याकरिता नेरड ग्रामवासीयांनी पंचायत समितीच्या कार्यालयापुढे उपोषणाला बसण्याचा मार्ग स्वीकारला आहे. 5 ऑक्टोबर सकाळी 11 वाजतापासून नेरड गावातील 13 ग्रामवासी उपोषणाला बसले आहेत. 7 पुरुष व 6 महिला आहेत. या उपोषणाची शासन काय दखल घेते याकडे लक्ष लागले आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.