सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज 3 नोव्हेंबरला वणीत

तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त शासकीय मैदानावर जाहीर कीर्तन 

 

जितेंद्र कोठारी, वणी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी येथील शासकीय मैदानावर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुदेव अर्बन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी व रेणुका ईरीगेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आपल्या कॉमेडी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या इंदोरिकर महाराज यांचे जगाभरात लाखों चाहते आहे. 3 नोव्हेंबर रोजी आयोजित जाहीर कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.