बहुगुणी डेस्क, वणी: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने वणी येथे आंतर शालेय समहू नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने २६ जानेवारी रोजी एस. पी. एम. हायस्कूलच्या रंगमंचावर पार पडणार आहे. स्पर्धा अ व ब अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून, प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांना दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट नृत्यासाठी बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. शहरातील शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी स्पर्धा संयोजक विनोद ताजने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष अनिल बिलोरिया व सचिव सागर बोढे यांनी केले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.



Comments are closed.