26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन सोहळा

सकाळी 7.30 वाजता विविध उपक्रमाद्वारे संविधान निर्मात्यांना अभिवादन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बहुगुणी डेस्क, वणी: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता वणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित राहणार आहेत. या अभिवादन सोहळ्यास शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.