जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

नागपूर येथील सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांची आता वणीत रुग्णसेवा.... विविध प्रकारच्या सर्जरी आता होणार वणीतच

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिद्ध सर्जन व मुळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांच्या जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. नांदेपेरा रोडवरील सेव्हन स्टार मॉल समोर समर्थ मेडिकल येथे डॉ. जाधव यांचे सर्जिकल क्लिनिक सुरू होणार आहे. दर रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत वणी, मारेगाव, झरी, वरोरा इत्यादी तालुक्यातील रुग्णांना उपचार घेता येणार आहे.

अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता वणीतच
जाधव सर्जिकल क्लिनिक येथे लेझरद्वारा विविध शस्त्रक्रिया सुविधा रुग्णांना मिळणार आहे. दुर्बिनद्वारा विना टाक्यांची शस्त्रक्रिया तसेच मूत्ररोग चिकित्सा आणि त्यावरचे उपचारही करता येणार आहे. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायलड सायनस, शरीरावरील विविध गाठी, कुरुप, मस्सा, चामखिळ इत्यादी शस्त्रक्रिया या क्लिनिकमध्ये केल्या जाणार आहे.

दूर्बिनीद्वारा विना टाक्याची शस्त्रक्रिया
अपेंडिक्स, पित्ताशयाची या दुर्बिनीद्वारा विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया रुग्णांना करता येणार आहे. यासह मुतखड्यांचे आजार, किडनीचे आजार, मुत्राशय, मुत्रनलिका, प्रोटेस्ट्र ग्रंथी इत्यादी मुत्ररोगाचे आजार यावरील निदान आणि उपचार देखील रुग्णांना करता येणार आहे.

31 ऑगस्ट रोजी जाधव सर्जिकल क्लिनिकचे दुपारी 11 वाजता थाटात उद्घाटन होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन होणार आहे. डॉ. शिरिष ठाकरे, डॉ. महेंद्र लोढा, डॉ गणेश लिमजे, डॉ. विजय राठोड, डॉ. अंकुश बलकी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे मुळचे वणीतील ढुमे नगर येथील रहिवाशी असून त्यांनी शालेय शिक्षण वणीतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी GMC नागपूर येथून आपले MBBS व MS चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना दिल्लीतील सुप्रसिद्ध FMAS (FELLOWSHIP IN Minimal Access Surgery) ही फेलोशिप मिळाली आहे. शिवाय त्यांना Coloproctology या विषयातील ISCP International Society of Coloproctology द्वारा फेलोशिप मिळालेली आहे. 

विशेष म्हणजे देशातच नव्हे तर जगभरात लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. राज गझभिये यांच्या मार्गदर्शनात डॉ. आशुतोष जाधव यांनी प्रशिक्षण घेतले आहे. डॉ. जाधव सप्टेंबर 2022 पासून दर रविवारी वणीतील जाधव सर्जिकल क्लिनिक येथे रुग्णसेवा देणार आहे. परिसरातील रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!