आधी दुचाकीने दिली धडक, नंतर केली बेदम मारहाण

तक्रार देण्यासाठी जात असताना पुन्हा रस्त्यात गाठून धमकी

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकीला धडक दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 24 वर्षीय तरुणाला लोखंडी कड्यासारख्या धातूच्या वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना वणीतील जटाशंकर चौक परिसरात घडली. या घटनेनंतर संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, प्रशांत नंदू गेडाम (24) हा शास्त्रीनगर वणी येथील रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिनांक 28/08/2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास दुचाकीने कामावर जात होता. यावेळी जटाशंकर चौकातील अंकुश मोबाईल शॉपीजवळ ते बाजूला थांबून फोनवर बोलत होता. दरम्यान, अचानक मागून आलेल्या एका दुचाकीने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. संबंधित दुचाकीवर 3 जण बसले होते. गाडी व्यवस्थित पाहून चालविण्याचे गेडाम यांनी सांगितले असता, दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीने कोणतेही कारण नसताना त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या हातात लोखंडी कड्यासारखी धातूची वस्तू होती. या वस्तूने मार लागल्याने गेडाम यांच्या ओठाला दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. मारहाण का करीत असल्याची विचारणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करून तेथून निघून गेले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव इंद्रपाल कैलास वागळकर (अंदाजे 19, रा. गोकुळनगर, वणी) असल्याची माहिती मिळाल्याचे गेडाम यांनी पोलिसांना सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ओठातून रक्त येत असल्याने ओळखीचे अभिजीत सोनटक्के यांनी गेडाम यांना दुचाकीने शासकीय रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. मात्र, एसपीएम शाळेजवळ टाटा मॅजिक वाहनाने आरोपी कुंदन कैलास वागळकर (अंदाजे 25, रा. गोकुळनगर, वणी)  हा आला. त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवून धमकी दिली. गेडाम याने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी इंद्रपाल कैलास वागळकर, कुंदन कैलास वागळकर आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 3(5), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

‘बदचलन आहे’ म्हणत चारित्र्यावर संशय; 7 जणांविरुद्ध गुन्हा

Comments are closed.