बहुगुणी डेस्क, वणी:आज शुक्रवारी संध्याकाळी 7 वा. वणीतील जत्रारोड वरील रामपुरा वार्ड जगरात्याचे आयोजन करण्यात आले आहे. काळाराम मंदिरासमोर हा जगराता होणार आहे. श्री काळाराम दुर्गा उत्सव मंडळ व श्रीरामपूरा दुर्गा उत्सव मंडळ वणी. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळाच्यावतीने घटस्थापनेपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. दररोज महाआरतीचे आयोजन करून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांना आरतीचा मान देत त्याना स्वागत, सन्मान केला गेला. यात संजय खाडे, विजय चोरडिया, प्रा. टीकाराम कोंगरे, वणी पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी आदी मान्यवरांनी उपस्थित लावली आहे. सार्वजनिक उत्सव सर्वांच्या सोबतीने केला जातोय याचे उदाहरण श्री काळाराम दुर्गा उत्सव मंडळात बघायला मिळत आहे. दिनांक 8 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजता शिवकालीन शास्त्रविद्येचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शिवाआनंद लाठीकाठी ग्रुपच्या वतीने तेजस्विनी राजू गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. आज होणा-या जगरात्याला मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.