जागृत पत्रकार संघाद्वारे पत्रकार दिन साजरा

जागृत पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद: इजहार शेख

विवेक तोटेवार, वणी: वणीतील शासकीय विश्रामगृह येथे 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन जागृत पत्रकार संघाद्वारे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँगेस यवतमाळ, नगरसेवक संतोष पारखी, राजू धावंजेवार विदर्भ अध्यक्ष व जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर हे उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि त्यांनी मुहूर्तमेढ रोवत सुरू केलेल्या पत्रकारितेतून पहिलं मराठी दैनिक देखील 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनानिमित्त 6 जानेवारी गुरुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जागृत पत्रकार संघाद्वारे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला सुरवात ही अनाथांची माय सिंधुताई सपकाळ व जागृत पत्रकार संघाचे सदस्य सुरेंद्र बोथरा यांना श्रद्धांजली देऊन 2 मिनिटांचे मौन ठेऊन करण्यात आली. या दिनानिमित्त इजहार शेख व संतोष पारखी यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

पत्रकारांना लिखाण करतांना चूक होऊ नये याची काळजी घ्यावी असे मत राजू धावंजेवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पुरूषोत्तम नवघरे यांनी केले.

कार्यक्रमाला जागृत पत्रकार संघाचे सचिव मोहम्मद मुस्ताक, उपाध्यक्ष विवेक तोटेवार, सहसचिव पुरुषोत्तम नवघरे, कोषाध्यक्ष श्रीकांत किटकुले, सदस्य गणेश रांगणकर, प्रशांत चंदनखेडे, आकाश दुबे, मनोज नवले, राहुल आहुजा, प्रवीण नैताम, सुभाष पाचभाई, बाबाराव राऊत उपस्थित होते.

Comments are closed.