शेतकऱ्यांच्या पहिल्या आत्महत्येच्या स्मरणार्थ झाले जेल भरो आंदोलन
आमदार देरकर उचलतील विविध विषयांवर विधानसभेत आवाज
बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या झाली. ती साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांनी केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे निमित्याने शेतकरी शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.) व श्रीगुरुदेव सेना यांचे वतीने लक्षवेधी महा जेलभरो आंदोलन रविवारी झाले. हे आंदोलन दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनमध्ये झाले.
या आंदोलनाची सुरवात वसंत जीनिंग कार्यालयापासून झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून पोलिस स्टेशन येथील दक्षता सभागृहात जेलभरो आंदोलन झाले. यात दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्यात. यात सर्व निराधार , लाडकी बहीण, कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन 5 हजार करण्यात यावे. निराधारांच्या उत्पन्नाची अट 21 हजारावरून 1 लाखापर्यंत करण्यात यावी. निराधारांचे वय 60 वर्षे करण्यात यावे. सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मान्य करावेत.
निवडणुकांमध्ये ई व्ही एम बंद करण्यात याव्यात. शेतकऱ्यांच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) यावरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी. वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 315 च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे. शेतमालांवरील निर्यात बंदी उठवावी. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर 12 बलुतेदार यांची (मायक्रो फायनान्स, पतसंस्था,खाजगी सावकार, बँकांचे कर्ज) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे. शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा.
वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा. शेतकऱ्यांच्या कापसाला किमान 12 हजार रूपये, सोयाबीनला 8 हजार रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना 10 हजार रूपये मासिक बेरोजगार भत्ता देण्यात यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निविदा विषयक नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई व आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम तांत्रिक दृष्ट्या ऑडिट करण्यात यावे.
वणी-मुकूटबन-घोन्सा चौफुली ते पुरड (नेरड) पर्यंतच्या मार्गावर सुमारे 60 करोड रूपये खर्चूनसुध्दा काम निकृष्ट झाले आहे. करिता या मार्गाचे बांधकाम पुन्हा करण्यात यावे. वणी शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावरील रेल्वे गेट पर्यंत चालू असलेले रस्ता बांधकाम अत्यंत निकृष्ट असून हे काम मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. हे काम नियमबाह्य पध्दतीने केले आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर सक्त कारवाई करण्यात यावी. सा. बां. विभाग पांढरकवडा यांच्या कडून सन 2016 ते 2024 पर्यंत खनिज विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक सभागृहाची चौकशी करण्यात यावी.
तसेच गावागावांतील बसविण्यात आलेले जल शुध्दीकरण यंत्र पूर्णत: बंद आहेत. या जलशुध्दीकरण यंत्रांची चौकशी करावी. संबधीत कंत्राटदार व अधिकारी यांच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नव्याने प्रस्तावित असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाची ईमारत ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे. ती जागा वणी शहराच्या कार्यक्षेत्रा बाहेर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना त्या ठिकाणी येणे जाणे करणे अत्यंत अवघड होईल. नागरीकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
त्या इमारतीची जागा वणी शहरात उपलब्ध करून त्या ठिकाणी न्यायालयाची इमारत बांधण्यात यावी. मौजा परसोडा येथे ही इमारत बांधावी. शहरातील ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून ट्रामा केअर सेंटर बांधण्यात आले आहे. त्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्या ठिकाणी लागणारे करोडो रूपयांचे साहित्य धूळ खात पडले आहे. त्या साहित्यांचा रुग्णांना कोणताही लाभ मिळत नाही.परिणामी त्यांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे सदर ट्रामा केअर सेंटर तत्काळ सुरू करण्यात यावे.
शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. आदी मागण्या करण्यात आल्या आहे, या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कलावंत, दिव्यांग व निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे, रामदास पखाले, पुंडलिक मोहितकर,
शहराध्यक्ष विनोद ढेंगळे, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंगेश गोरे, प्यारेलाल मेश्राम, रत्ना पारखी, निर्मला मडावी, राजू झाडे, वसंत कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजी डाखरे, ज्ञानेश्वर कोडापे, सिंधू गोरे, पुंडलिक कोंगरे, रंगराव भोयर, प्रतिमा मडावी, शोभा तुराणकर, भाऊराव दुरटकर, मेघबाई भगत, बालाजी गुरनुले, पंचफुला मंगाम, आदींनी परिश्रम घेतलेत.
आंदोलकांचा आवाज विधानसभेत पोहोचवणार
हे जेलभरो आंदोलन खूप महत्त्वाचे होते. मी स्वत: जातीनं आंदोलकांना यावेळी भेट दिली. आंदोलकांचे प्रश्न समजून घेत निवेदन स्वीकारले. त्यातील सर्व मागण्यांसाठी मी विधानसभेत आवाज उचलेन. मी आंदोलकांना त्याची ग्वाही देतो. मी सदैव रास्त मागण्यांसाठी आग्रही राहीन.
संजय देरकर
आमदार, वणी विधानसभा क्षेत्र
Comments are closed.