उद्या शहीद दिनाला 23 मार्च रोजी गाजणार महा जेलभरो आंदोलन

जिल्ह्यातील आत्महत्या करणाऱ्या पहिल्या शेतकरी दाम्पत्याच्या स्मृत्यर्थ लढा

बहुगुणी डेस्क, वणी: कापसाचा जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जिल्हा म्हणून झाली आहे. याच जिल्ह्यातील पहिली आत्महत्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती यांनी केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याचे स्मरण आयोजित केले आहे.

या निमित्याने शेतकरी, शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यांसाठी श्रीगुरुदेव सेना लक्षवेधी महा जेलभरो आंदोलन करणार आहे. हे आंदोलन रविवार दिनांक 23 मार्चला दुपारी 2 वाजता येथील पोलीस स्टेशनमध्ये होईल. या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक आमदार संजय देरकर असतील. श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात ते होणार आहे..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) च्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम, यवतमाळ जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार, राकाँपचे राज्य संघटक सचिव विजय नगराळे, वणी विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे, शेतकरी नेते देवराव धांडे, कलावंत संघटनेचे विदर्भ अध्यक्ष रामदास पखाले, आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

या आंदोलनात सर्व निराधार , लाडकी बहीण, कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन 5 हजार रूपये करण्यात यावे. निराधारांच्या उत्पन्नाची अट 21 हजारांवरून 1 लाखांपर्यंत करण्यात यावी. निराधारांची वयोमर्यादा 60 वर्षे करण्यात यावी. सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मान्य करावेत.

निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ई.व्ही.एम. बंद करण्यात याव्यात. शेतकऱ्यांच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) यावरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी. वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 315च्या बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे. सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार यांची (मायक्रो फायनान्स, पतसंस्था, खाजगी सावकार, बँकांचे कर्ज ) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे.

शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा. कापसाला किमान 12 हजार रूपये, सोयाबीनला 8 हजार रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना 10 हजार रूपये मासिक भत्ता देण्यात यावा. शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा.

वणी येथील कोळशाची रेल्वेसाठी हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात येणार आहेत. या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, कलावंतांनी, दिव्यांगांनी व निराधारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर कोली आहे.

या आंदोलनासाठी चंपत पाचभाई, बाबाराव कुळमेथे, मधुकर वाभीटकर, विजय आस्कर, मारुती पाटील खापणे, रत्‍ना पारखी, निर्मला मडावी, राजू झाडे, वसंत कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजी डाखरे, सचिन वाभीटकर, विलास काळे, अरविंद येसेकर, ज्ञानेश्वर कोडापे, सिंधू गोरे, पुंडलिक कोंगरे, संगीता सातपुते, रंगराव भोयर, शोभा तुराणकर, भाऊराव दुरटकर, मेघा भगत, बालाजी गुरनुले, पंचफुला मंगाम, शकुंतला हनुमंते, मंगला मडचापे, अर्चनाकातकडे, राजू सिडाम, गंगाधर महाराज लोणसावडे, सुभाष पानघाटे, सुहास सप्रे, दिगंबर कुमरे, संभाजी पारशिवे, राकेश कापनवार आदी परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.