उन्हाळ्यात तहानलेल्यांसाठी श्री जैन महिला मंडळाच्या माता-भगिनी सरसावल्यात

गांधी चौकात सुरू केली पाणपोई, विजय चोरडिया यांनी केले लोकार्पण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. तसंच ते आईच्या वात्सल्याचंही मूर्तिमंत उदाहरण आहे. कोणत्याही जिवाची उन्हात काहीली होत असल्याचं त्यांना बघवत नाही. वाढत्या उन्हाने सर्वांचाच जीव कासावीस होतो. तापमानही दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली तहान भागवण्यासाठी 20 रूपयांची पाण्याची बाटली विकत घेणं सर्वांनाच शक्य नाही. म्हणून गांधी चौकात येणाऱ्या सर्वांनाच पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून काही माता-भगिनी सरसावल्यात.

परमपूज्य 1008 आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त श्री जैन महिला मंडळाने तुटल्या कमानीजवळ पाणपोई सुरू केली. या पाणपोईचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या हस्ते झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छाजेड, श्री जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला चंद्रकुमार चोरडिया, सचिव रूपा खिवंसरा, सहसचिव विद्या मुथा, सदस्य ज्योती चोरडिया, प्रिया कटारिया, राखी कुचेरिया, शोभा खिवंसरा, अंशुमा झाबक, पुष्पा कोटेचा, प्रेमा चोरडिया यांसह जैन महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.

 

 

Comments are closed.