बहुगुणी डेस्क, वणी: आज रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी अमृत भवन येथे दु. 2 वा. धार्मिक व देशभक्तीवर आधारीत सोलो व गृप डान्स स्पर्धा होणार आहे. तर दु. 3 वा. 1 मिनिट स्पर्धा व हौजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा वर्ष 1 ते 6, वर्ष 7 ते 11 व वर्ष 12 ते 18 अशा तीन वयोगटात होणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी राजू रिंगोले, ख्याती चोरडिया, विद्या मुथा यांना संपर्क साधता येणार आहे. शनिवारी दुपारी अमृत भवन येथे विविध स्पर्धा रंगल्या. तर संध्याकाळी श्री विनायक मंगल कार्यालयात ‘संध्याछाया’ या दोन अंकी नाटकाचा प्रयोग रंगला. या नाटकाला वणीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नाटकादरम्यान वणीतील विविध समाजाच्या संघटना तसेच शहरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक इ. क्षेत्रात काम करणा-या संस्थेचा सन्मान करण्यात आला. शहरातील सुमारे 33 संस्थेच्या कामाची दखल घेत संस्थेच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
आज संध्या 6.30 वा. अमृत भवन येथे कवि संमेलन रंगणार आहे. यात महाराष्ट्रातील विविध शहरातील नामवंत कवि सहभागी होणार आहे. दर्जेदार कविमुळे ही मैफल चांगलीच रंगणार आहे. दुपारी आयोजित विविध स्पर्धा व संध्याकाळी होणा-या कवि संमेलनाला वणीकरांनी आवर्जून हजेरी लावावी, असे आवाहन जन्माष्टमी महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड कुणाल विजय चोरडिया यांनी केले आहे.
स्पर्धेत बक्षिसांची लयलूट
आज अमृत भवन येथे दु. 2 वाजेपासून विविध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत बक्षिसांचा लयलूट राहणार आहे. गृप डान्ससाठी प्रथम बक्षिस 11 हजार, द्वितीय बक्षिस 5100 रु. तर तृतीय बक्षिस 3100 रुपये राहणार आहे. तर एकल नृत्य स्पर्धेत वय 6 ते 10 व वय 11 ते 18 गटासाठी प्रथम 5100 रु, द्वितीय 2100 रु. तर तृतीय बक्षिस 1100 रुपये आहे. तर वय वर्ष 1 ते 5 गटासाठी प्रथम बक्षिस 2100 रु. द्वितीय 1100 रु. तर तृतीत बक्षिय 500 रुपये राहणार आहेत. ही स्पर्धा धार्मिक व देशभक्तीपर गितांवर आधारित आहे.
‘संध्याछाया’ नाटकाला उत्स्फुर्त प्रतिसाद
संध्याछाया हे जयवंत दळवी याचे एक प्रसिद्ध नाटक आहे. एका दांपत्याचा एक मुलगा लष्करात, तर दुसरा मुलगा परदेशी नोकरीला असतो. परदेशातील मुलगा आई-वडिलांना न सांगता लग्न करतो, आठ-दहा वर्षे तो घरी परत येत नाही. परततो पण केवळ भेटायला, तर दुसर्या मुलाचा मृत्यू होतो. अशी या नाटकाची थोडक्यात कथा आहे. या नाटकाने प्रेक्षकांना अखेर पर्यंत खिळवून ठेवले. (पाहा नाटकाची एक झलक)
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन्माष्टी समितीचे सचिव उमेश पोद्दार, कार्याध्यक्ष रितेश फेरवाणी, उपाध्यक्ष अनिल रेभे, विशाल दुधबळे, सहसचिव सुरेश मांडवकर, कोषाध्यक्ष- सचिन क्षिरसागर, सहकोषाध्यक्ष – शुभम मदान, प्रसिद्धी प्रमुख – निखिल मार्कडे, सहप्रसिद्धी प्रमुख – हर्ष भारवाणी, सहकार्याध्यक्ष राजु रिंगोले, सहसंयोजक मयुर गोयंका परिश्रम घेत आहे. विजय चोरडिया, विजय पुण्यानी, राजेश बत्रा, संतोष मार्कंडे, आशिष गुप्ता, नारायण गोडे, दिवान फेरवानी, राजाभाऊ बिलोरिया, अरुण कावडकर, गजानन बत्तुलवार यांच्या मार्गदर्शनात या महोत्सवाचे नियोजन होत आहे.
Comments are closed.