चालत्या बसमध्ये मारला हात, शेजाऱ्यानेच केला घात

बसमधून महिलेचे दागिने लंपास, नंतर उलगडले रहस्य

बहुगुणी डेस्क, वणी: लग्न, रिसेप्शन म्हटलं, दागिन्यांची हौस पूर्ण होते. आपले खास दागिने घालून मिरवण्यास सर्वांनाचाआवडतं. त्यासाठी ठेवणीतले दागिने घेऊन आपण प्रवासाला निघतो. मात्र गर्दीचा फायदा घेत ते दागिने पळवणारे भामटेही असतातच. अशाच एका भामट्याने सोमवार दिनांक 12 मे रोजी बसमधून मारेगाव येथील ज्योती इंद्रपाल उलमाले (49) यांचे दागिने लंपास केलेत. मारेगाव ते करंजी पर्यंतचा प्रवास होईपर्यंत हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. मात्र गावात पोहचल्यावर पर्स उघडून पाहिली. तेव्हा फिर्यादीला धक्काच बसला. पायाखालची जमीनच सरकली. महिलेच्या पर्समधील थोडे थोडके नव्हे तर तब्बल 6 तोळ्यांचे अंदाजे 3 लाख 54 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अनोळखी महिलेने लंपास केलेत.

एका नातेवाईतकाच्या लग्नाचं रिसेप्शन होतं. त्यासाठी फिर्यादी ज्योती इंद्रपाल उलमाले (49) आपल्या मुलीसह करंजीला जाण्यासाठी मारेगाव येथून अहेरी ते माहूर जाणाऱ्या बसमध्ये बसल्यात. मुलगी कंडक्टरच्या बाजूच्या सीटवर बसली. तर महिला पाठीमागील सीटवर बसलेल्या दोघांना सरकवून त्यांच्याजवळ बसली. गर्दी असल्याने एक महिला त्यांच्याजवळ उभी होती. फिर्यादी महिलेने तिकीट काढण्यासाठी पर्स उघडून पैसे काढले. तेव्हा ती महिला पाळत ठेवून असल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही.

आपला स्टॉप म्हणजेच करंजी गाव आल्यावर ज्योती इंद्रपाल उलमाले आपल्या मुलीसह बस मधून उतरल्यात. त्यांच्या भाच्याच्या बाईकवरून त्या आईच्या घरी वाढोण्याला गेल्यात. तिथं तयारी करून नंतर त्या रिसेप्शनसाठी नजिकच्या सोनुर्ली गावात पोहचल्यात. रिसेप्शनमध्ये घालण्यासाठी पर्समध्ये ठेवलेली 30 ग्रामची सोन्याची पोत व 29 ग्रामचा सोन्याचा हार काढण्यासाठी पर्स उघडली. ते दागिने गायब झाले होते. या घडनेनंतर फिर्यादी महिलेने चोरी झाल्याची तक्रार महिलेनी मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.