सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बुधवारी शेतात कापूस वेचणा-या एका महिलेचे एका भामट्याने हल्ला करत दागिने लुटले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या तासभरात आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले. दत्ता सुरेश लिंगनवार (30) रा. सदोबा सावळी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा मुददेमाल व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा अंदाजे 50 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सतपल्ली येथे काल दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास शोभा विजय सिन्नमवार ही महिला शेतात कापूस वेचत होती. दरम्यान तिथे एक अऩोळखी इसम आला. त्याने त्याने शोभाला अंगावरचे दागिने मला दे नाहीतर मारून टाकीन अशी धमकी दिली. तिने त्याला नकार दिल्यावर आरोपीने महिलेवर हल्ला केला व तिला गळा दाबुन जमिनीवर पाडले.
आरोपी शोभा यांच्या नाकातील सोन्याच्या विश्या घेऊन तिथून फरार झाला. विश्याची किंमत अंदाजे 20 हजार रूपये आहे. शोभाने तात्काळ घरी येऊन घडलेली घटना आपला मुलगाा सुनिल सिन्नमवार याला सांगितली. सुनिलने याची माहिती मोबाईलद्वारा पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांना दिली.
अवघ्या एका तासात आरोपी जेरबंद
ठाणेदार बारापात्रे यांनी आरोपीला पकड़ण्याकरीता एक टिम तयार केली. टिमने तातडीने सूत्र हलवून खबरीकडून माहिती काढली. माहिती मिळताच ते आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले व अवघ्या एका तासात आरोपी दत्ता सुरेश लिंगनवार (30) याला अटक केली. फिर्यादी शोभा विजय सिन्नमवार यांच्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपीवर कलम भादंवि 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. यापूर्वी दत्ता लिंगनवार यांच्या विरुध्द मारेगाव, वणी, मुकुटबन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, ठाणेदार अमोल बागपात्रे याचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे, नायक पोकॉ संदिप सोयाम, नरेश गोडे, हेमंत कामतवार, तलांडे होमगार्ड मो इरफान मो युसुफ यांनी केली.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: