करला रंगला जुगार…13 जुगा-यांना अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

नायगाव (खु) व मोहुर्ली येथे धाड, अनेक जुगारी पळून जाण्यात यशस्वी

बहुगुणी डेस्क, वणी: कर निमित्त परिसरातील अनेक गावांमध्ये जुगार रंगतो. दिनांक 3 सप्टेंबर रोजी पोलिसांनी 3 विविध ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी 13 जुगा-यांना अटक केली. तर काही पळून जाण्यात यशस्वी झालेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यातील एक कारवाई नायगाव (खुर्द) तर इतर दोन कारवाई मोहुर्ली येथील आहे. 

यातील सर्वात मोठी घटना ही नायगाव येथील आहे. वणी पोलिसांचे पथक रात्री पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना खबरी कडून नायगाव (खुर्द) येथे एका किराणा दुकानासमोर सार्वजनिक रोडवर पत्त्यांचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरून रात्री 9 वाजताच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाला काही इसम जुगार खेळताना दिसले. पोलिसांनी धाड टाकताच काही लोक पळून गेलेत तर 7 जुगारी पोलिसांच्या हाती लागले. यात नायगाव, कोना व माळीपुरा वणी येथील जुगा-यांचा समावेश आहे. या सर्वांकडून सुमारे 7 हजारांची रक्कम, 4 मोबाईल असा सुमारे 65000 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इतर दोन घटना मोहुर्ली येथील विरकुंड रोडवरची आहे. खबरीच्या माहितीवरून दु. पावने दोन वाजताच्या सुमारास पोलीस पथक या ठिकाणी पोहोचले. तिथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम 52 पत्तावर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी धाड टाकली असता 4 लोक पोलिसांच्या हाती लागले तर इतर लोक पळून जाण्यात यशस्वी झालेत. आरोपींमध्ये एक मोहुर्ली, एक बोपापूर, एक सबा कॉलोनी वणी व एक जैन ले आऊट वणी येथील जुगा-याचा समावेश आहे. त्यांच्याकडून नगदी 300 रुपये व इतर मुद्देमाल असा सुमारे 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

झंडी-मुंडीवर कारवाई
याच वेळी पोलिसांनी झंडी-मुंडी या जुगारावर देखील कारवाई केली. मोहुर्ली येथील विरकुंड रोडवरील सार्वजनिक ठिकाणी काही लोक घोळका करून झंडी-मुंडी या खेळावर पैसे लावत होते. पोलिसांनी धाड टाकत गावातील दोघांना अटक केली तर इतर लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून 850 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.

कॉलेजमधल्या मुलांनीच काढली क्लासमेट मुलीची छेड

Comments are closed.