विवेक तोटेवार, वणी: 25 जानेवारी रोजी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी द्वारा आयोजित थोर स्वातंत्र्यसेनानी व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाज स्नेहमीलन, सांस्कृतीक कार्यक्रम आणि कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी लिहिलेल्या “विनोद प्रिय गांधीजी, भारताचा थोर भिक्षेकरी गांधी, मुलांचे गांधी, स्त्रियांचे गांधी ” या चार पुस्तकांचे पूनर्प्रकाशन सोहळा शेतकरी मंदिर, वणी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बंधू भगिनीं व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती कार्यक्रमाची सुरुवात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले तसेच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला हारार्पण आणि दिपप्रज्वलन करून झाली. या उदघाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्का दुधेवार (अध्यक्षा बेलदार समाज महिला कार्यकारिणी, वणी) प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेविका किरण देरकर, ललिता बोदकूरवार, शामा तोटावार आणि रेखा बोनगीरवार उपस्थित होत्या. यावेळी महिलांचा हळदीकुंकू व वाण वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार, विशेष अतिथी म्हणून वणी विधानसभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप कोरपेनवार (अध्यक्ष- नगर सेवा समिती), तसेच अल्का दुधेवार (अध्यक्षा बेलदार समाज महिला कार्यकारिणी, वणी) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे सचिव राकेश बरशेट्टीवार , प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष गजानन चंदावार तर आभार कु.समृद्धी टिप्रमवार यांनी केले. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची शासकीय जयंती, गौरवग्रंथ, चलचित्रपट काढावे, बेलदार समाजाला आर्थिक महामंडळ द्यावे या मागण्याकरिता शासन स्तरावर बेलदार समाजाचा सतत प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू राहणार आहे. नुकताच चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच मुल येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेला कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांचे नाव दिल्याने महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आपल्या प्रास्तविकेत गजानन चंदावार यांनी व्यक्त केले.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार हे एक कर्तुत्वाने मोठे झालेले व्यक्तिमत्व होते. आपल्या समाजाच्या शासन दरबारी असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल असे आश्वासन वणी विधासभेचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी दिले. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्यांचा प्रचार व प्रसार आपण आजपर्यंत केलेले आहोतच आणि समोरही करू. समाजासाठी समाजभवन, या वर्षभरात उभारू आणि समाजासाठी जे जे योग्य करता येईल ते करू आणि शासन दरबारी उर्वरित मागण्याकरिता ताकदीने पाठपुरावा करू असे प्रदीप बोनगीरवार म्हणाले. तसेच यावेळी दिलीप कोरपेनवार सर यांनीही समाजातील गरजू मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
यावेळी घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथमकोमल वेलपुलवार, द्वितीय पायल बरशेट्टीवार आणि तृतीय क्रमांक अंकिता पानगंटीवार यांनी पटकाविला. तसेच नृत्य स्पर्धेत प्रथम जान्हवी मदीकुंटावार, द्वितीय कुंजन जलेलवार, तृतीय क्रमांक नित्या कन्नूरवार यांनी प्राप्त केला. या सर्व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी यांना गौरवचिन्ह व समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या समाज बंधू भगिनींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था वणी, बेलदार समाज महिला कार्यकारिणी वणी, युवा शहर कार्यकारिणी वणीचे सर्व पदाधिकारी, सल्लागार मंडळी आणि वणीतील समाज बंधुभगिनींनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.
Comments are closed.