क्रेडाई वणीच्या अध्यक्ष पदावर किरण दिकुंडवार तर सचिवपदी संजय निमकर

जितेंद्र कोठारी, वणी : भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी क्रेडाई (CREDAI) या सर्वात मोठी संस्थेची वणी तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच 28 जुलै रोजी करण्यात आली. हॉटेल V9 मध्ये आयोजित या बैठकीत येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किरण दिकुंडवाऱ यांची वर्ष 2023 -25 करिता क्रेडाई वणीचे अध्यक्ष पदावर अविरोध निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी प्रख्यात ओम बिल्डर्सचे संचालक संजय निमकर यांना देण्यात आली. क्रेडाई वणीच्या उपाध्यक्ष विवेक ताटेवार व कोषाध्यक्ष म्हणून मनीष चौधरी यांची निवड यावेळी करण्यात आली.

यावेली राजेश झिलपिलवार, रमेश सुंकूरवार, संजय कोडगीवार, राम पोदुतवार, विजय चोरडिया, सुनील देरकर, सुनील कातकडे, निलेश कटारिया, मनीष कोंडावार, अनिल उत्तरवार, अशोक भंडारी, सुशील मुथा, दामोधर देठे, शैलेश तोटेवार, श्रीकांत गारघाटे, जमीर खान, देवराव भगत, संजय पोटदुखे, निकेत गुप्ता, विनोद खुराना, आशिष काळे, केतन गुंडावार, विवेक पांडे, सुहास गटलवार, राजू विराणी, अजिंक्य मत्ते, सुधीर गाडगे, बंटी कोठारी, सुधीर चोरडिया, जय आबड, हितेन अटारा, अनुज मुकेवार, संदीप जयस्वाल, आचल जोबनपुत्रा, सुरज महातळे, निखील केडीया, राहुल कुचनकर, पंकज गुप्ता, साहिल सलाट हे (CREDAI) वणीचे सदस्य उपस्थित होते.

बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणून त्याच्या समस्या सोडवण्या बरोबरच वणीकरांना निवासाच्या दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. शहराचा विकास आणि पर्यावरण संतुलन राखण्याचा आमचा प्रयत्न राहील. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येईल.

किरण दिकुंडवार – अध्यक्ष, क्रेडाई वणी 

Comments are closed.