पुन्हा एक चाकूबाज बार समोर लागला पोलिसांच्या हाती

सार्वजनिक रोडवर अवैधरीत्या धारदार चाकू घेऊन होता फिरत

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस शहरात चाकुबाजांची दहशत वाढत आहे. नुकतीच दीपक टॉकीज परिसरात अशाच एका चाकुने दहशत गाजवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच दुसरा एक चाकुबाज कार्निवल बार समोरील सार्वजनिक रोडवर आढळला. तो परिसरात हातात धारदार चाकू घेऊन दहशत पसरवीत होता.

ही बाब पोलिसांना कळली. त्यांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतलं. सेवानगर येथील हरीश राजू तोमसकर (29) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून एक लोखंडी मूठ असलेला चाकू ज्याचे पाते लोखंडी, धारदार, टोकदार व निमुळते आहे, पोलिसांनी जप्त केले. कव्हरसहीत संपूर्ण लांबी 35 से.मी, लोखंडी कव्हरची लांबी 25 से.मी, कवर रहीत चाकुची लांबी 33 से.मी, लोखंडी पात्याची लांबी 24 से.मी. आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार डीबी पथकातील पीएसआय गुल्हाने, वसीम, निरंजन, गजानन, मोनेश्वर यांनी पार पाडली. आरोपीवर शस्त्र अधिनीयमसहकलम 135 मपोकानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि गुल्हाने करत आहेत.

Comments are closed.