विवेक तोटेवार, वणी: कोलेरा फाट्याजवळ एका दुचाकी चालकाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. रोहीत दुर्गेश हरणखेडे (वय अंदाजे 25) असे मृताचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत डम्पर चालक नोकरीला होता. रस्त्यात कोसळलेल्या झाडाला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला. यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत रोहीत दुर्गेश हरणखेडे हा मुळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी होता. तो उकणी जवळील वेकोलिसाठी काम ओबी हटवणा-या कंपनीसाठी डम्पर चालक म्हणून काम करीत होता. तो जवळच असलेल्या बोरगाव येथे राहायचा. शनिवारी दिनांक 13 जून रोजी तो कामानिमित्त दुचाकीने वणीला आला होता.
कोसळलेले झाड ठरले मृत्यूचे कारण
सध्या वादळी वा-यामुळे काही झाडं कोसळले आहे. दोन दिवसांआधी कोलेरा फाट्याजवळ उकणी कडे जाणा-या मार्गावरील विलायती चिंचेचे झाडं वादळी वा-यामुळे कोसळले होते. हे झाड रस्त्यावर आले होते. रात्री घरी परतताना रोहितला या पडलेल्या झाडाचा अंदाज आला नाही व त्याची दुचाकी झाडाला धडकली.

हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात रोहीतच्या डोक्याला भीषण मार लागला. यात रोहीतचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. रस्त्यावर कोसळलेले झाड न उचलल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक रहिवासी बोलत आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहे.



Comments are closed.