कोल्हापुरातील घटनेचा MIM वणी तर्फे निषेध

प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्यात अनेक मागण्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विशालगड तथा कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथील झालेल्या घटनेचा एआयएमआयएमने निषेध केला. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार एआयएमआयएम वणीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.

निवेदनात दंगलखोरांवर UAPA कायद्यांतर्गत कारवाई करावी. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. धार्मिक स्थळे, दर्गे आणि घरांच्या नुकसानीची सरकारने लवकरात लवकर भरपाई द्यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी वणी शहराचे अध्यक्ष आसीम हुसेन व कार्यकारिणी सदस्य शाहबाज अदीब, अजहर शेख, सय्यद मुफीज, सय्यद मुस्तकीम, बिलाल अंबादादे, साइम अली, राहत शेख, इम्रान शेख, रेहान शेख, आरिफ रजा व कार्यकर्ता उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.