कुंभ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवरदेव: अरविंद ठाकरे
गावाच्या विकासासाठी परिवर्तन करण्याचे मतदारांना आवाहन
नागेश रायपुरे, मारेगाव: 50 वर्षात कोणतेही विकासकार्य झाले नाही. गावात गावपुढारी केवळ नवरदेवासारखे निवडणुकीसाठी येतात आणि त्यानंतर कधी दिसतच नाही. अशी घाणाघाती टीका ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे यांनी केली. वणी बहुगुणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
वणी बहुगुणीशी बोलताना ते म्हणाले की कुंभा हे तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. मारेगाव नंतर मोठं असेलेलं कुंभा हेच गाव आहे. सर्व संसाधनं गावात आहे शिवाय विकासासाठी अनेक संधीही आहे. मात्र नेत्यांच्या नवरदेवासारख्या वृत्तीमुळे गावात अपेक्षीत विकास झाला नाही. नेते नवरदेवासारखे दोन दिवस दिसतात आणि नंतर गायब होतात. याचा फटका सर्वसामान्य कुंभावासियांना भोगावा लागत आहे. असा आरोप यावेळी अरविंद ठाकरे यांनी केला.
गावाचा सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक विकास हेच ध्येय
गावात कोणतीही सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक, कृषी, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात जी मदत लागते ती मी करण्याचा प्रयत्न करतो. ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी असा सर्वांगीण विकास करण्यास धजावत असल्याने माझ्यासारख्या सामाजिक कार्यात असलेल्या व्यक्तीला नाईलाजाने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागत आहे.
– अरविंद ठाकरे, ग्राम परिवर्तन पॅनल
कुंभा येथे तीन प्रभाग आहेत. यात प्रभाग क्र.1 मध्ये अनु.जमाती मधून राजकुमार खुशाल चांदेकर, ना.मा.प्र.मधून गजानन मारोती ठाकरे, सर्वसाधारण स्त्री मधून सुचिता अनंता महाजन उभे आहेत. प्रभाग क्र.2 मध्ये सर्वसाधारण मधून अरविंद वसंत ठाकरे, ना.मा.प्र.स्त्री मधुन अश्विता अरविंद ठाकरे, सर्वसाधारण स्त्री साठी गंगा विनोद ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्र.3 मध्ये सर्वसाधारण साठी विनायक महादेव गाऊत्रे, सर्वसाधारण स्त्री मधून सुनीता अशोक आवारी तर सर्वसाधारण स्त्री मधून माया मोतीराम पडोळे उभ्या आहे. अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वात हे 9 उमेदवार ग्रा.प.निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नागेश रायपुरे, मारेगाव: येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीची तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. अश्यातच तालुक्यातील कुंभा ग्राम पंचायत निवडणूकीच्या प्रचारांत समाजसेवक अरविंद वसंत ठाकरे यांचे ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे यांना गावाचा विकास याच ध्येयाने पॅनल निवडणुकीत उतरले आहे.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्त ‘वणी बहुगुणी’ गावागावात जाऊन पॅनल आणि उमेदवारांशी संवाद साधत आहे. यानिमित्त वणी बहुगुणीने कुंभा येथील समाजिक कार्यकर्ते अरविंद वसंत ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता.