बहुगुणी डेस्क, वणी: एखादा फिल्मी सीन आठवा. गावचा ठाकूर बाजारातून जात आहे. सगळे लोक रस्त्याच्या कडेला सरकून उभे होतात. एक वक्ती नकळत त्या ठाकूरच्या पुढं चालत असते. ठाकूरचं डोकं भडकतं. तो त्या मजुराला बेदम चोप देतो. असंच काहीसं चित्र देशमुखवाडी परिसरात सोमवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 7.00च्या सुमारास प्रत्यक्षात घडलं. सामान्य मजूर आपल्यासमोर जात आहे. या अत्यंत हास्यास्पद कारणावरून ठेकेदारानं एका गरीब मजुराला मारझोड करून रक्तबंबाळ केलं.
तक्रारीनुसार मजुरी करणारे फिर्यादी संतोष विश्वनाथ मडावी (43) देशमुखवाडीत राहतात. त्यांचा जगदीश जाधव (42) या फुकटवाडीत राहणाऱ्या ठेकेदाराशी चांगलाच परिचय आहे. यांच्यात व्यावसायिक संबंध आहेत. मात्र ठेकेदार जगदीश जाधव नेहमीच संतोष विश्वनाथ मडावीच्या कामांत त्रुटी काढायचा. कामांच्या कारणावरुन वाद घालायचा. शिवीगाळ करून मारण्याची धमकीही द्यायचा. मात्र ठेकेदाराच्या या स्वभावाला व वागण्याला मजुरानं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. दोघेही आपापलं काम नीट करत होते.
मात्र सोमवारी सायंकाळी भलतंच घडलं. संतोषनंही त्याची अपेक्षा केली नव्हती, असा प्रसंग त्याच्यावर गुदरला. नेहमीप्रमाणे संतोष सायंकाळी 7.00 वाजताच्या सुमारास चर्चच्या रोडनं आपल्या घरी जात होता. वाटेत एका पानठेल्याजवळ संतोष मडावी आणि जगदीश जाधव यांची भेट झाली. जाधवनं संतोषला विचारलं, की तू मजूर असून माझ्यासारख्या ठेकेदारापुढून कसा जात आहे? तू मजुर आहेस आणि मजूरच राहा. उगाच ठेकेदार बनायचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणून जाधवनं मडावीला शिवीगाळ सुरू केली. थापडबुक्यानी मारहाणही केली.
अचानक झालेल्या प्रकारानं संतोष बिथरला. तितक्यात जाधवनं त्याच्या हातातील कोणती तर वस्तु संतोषच्या उजव्या भुवईजवळ हाणली. तो जखमी होऊन रक्त वाहू लागलं. जाधव इथंच थांबला नाही, तर त्यानं एखाद्या दिवशी पाहून घेतो अशी धमकीही दिली. मग मात्र संतोष मडावीनं पोलीस स्टेशनच गाठलं. जगदीश जाधवची रीतसर तक्रार केली. त्यावरून आरोपी जगदीश जाधवावर बीएनएस कलम 118(3), 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
नगरपरिषद शाळेचा विद्यार्थी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजचा प्राचार्य होतो
पानटपरी चालकाला दुकानात घुसून बेदम मारहाण, वणीचा बीड पॅटर्न !
Comments are closed.