नृसिंह व्यायामशाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण

कु. तेजवस्वीनी गव्हाणे देतेय स्वसंरक्षणाचे धडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण अवघ्या 9 व्या वर्गात असलेली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे ही देत आहे. रोज या प्रशिक्षणात 40 ते 50 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत आहे. रोज सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 6 ते 7.30 या कालावधीत हे प्रशिक्षण होत आहे. चिमुकल्यासाठी सुरू असलेल्या या प्रशिक्षणाचे सध्या परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.

तेजस्वीनीला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृसिंह आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या राजताज हिरा आखाडा येथे घेतले आहे.

तेजस्वीनी ही एसपीएम शाळेची विदयार्थीनी असून ती नुकतीच इयत्ता 8 वी उत्तीर्ण केली आहे. ती लाठिकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक इत्यादी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लू बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. कु. तेजस्वीनी ही शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजू गव्हाणे यांची कन्या आहे.

हे देखील वाचा:

महिला सक्षमीकरणासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा: यशोमती ठाकूर

Comments are closed.