अवजड वाहनास प्रवेश बंदचा उडतोय फज्जा

वणी-नांदेपेरा मार्गाची होत आहे चाळणी

विवेक तोटेवार, वणी: अवजड वाहतुकीस प्रतिबंध असताना वणी ते नांदेपेरा मार्गावरून अवजड वाहतूक सुरू आहे. ज्यामुळे रस्त्याची चाळणी होत आहे. शिवाय लहान वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. तर वाहतूक विभाग मात्र सर्व काही दिसत असतानाही झोपेचे सोंग घेऊन आहे. 

Podar School 2025

10 ऑक्टोबर रोजी गावकऱ्यांनी वणी-नांदेपरा रोडवर अवजड वाहनांविरोधात बंद पुकारून रस्तारोको आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले व 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरून अवजड वाहने बंद करण्याचा आदेश काढला होता. या मार्गावरून चालणारी वाहतूक ही वणी-मारेगाव – करंजी – वडकी – खैरी – वरोरा (एकोना) मार्गाने वळविण्यात आली. परंतु या आदेशाला वाहतूक विभाग केराची टोपली दाखवत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुचाकीचालकांवर कारवाई करून आपले कर्तव्य बजावणारा वाहतूक विभाग येथे मात्र मूग गिळून गप्प बसला आहे. 30 डिसेंबर रोजी यवतमाळ रोडवर धावत्या पिकअप वाहनाला ऑटोची धडक बसली. ज्यामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. असाच प्रकार या रस्त्यावर झाल्यास वाहतूक प्रशासनाला जाग येईल काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

वाहतूक प्रशासनाकडून कारवाईची गरज-प्रफुल शेंडे, नांदेपेरा

नांदेपेरा ते वणी नेहमी प्रवास करताना आम्हाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहतूक प्रशासनाकडून यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने या मार्गाने अवजड वाहतुक दिवसरात्र चालू आहे. याचा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर प्रशासनाने लक्ष देवुन ही अवजड वाहतूक थांबवावी.

Comments are closed.