मार्की येथील लीना लेंझे (उदकवार) बीएड महाविद्यालयातून प्रथम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की सारख्या लहान खेडेगावात राहून तसेच आपल्या संसाराचा गाडा हाकत केवळ परिश्रमाने लीना लेंझे (उदकवार) ह्या विद्यर्थींनीने बीएड अभ्यासक्रमात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्या चंद्रपूर येथील कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात शिकत होत्या.

गोंडवाना विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान कमलादेवी शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी लीना लेंझे ( उदकवार) हिने पटकावला आहे. लीना हिने ८.८२ स्कोअर प्राप्त केला आहे. लीना झरी तालुक्यातील मार्किं येथील पत्रकार तथा समाजसेवक जयंत उदकवार यांची पत्नी असून दोघेही उच्च शिक्षण घेत आहे.

त्यांच्या या यशाबाबत विभागप्रमुख रवींद्र पळवेकर, प्रा. सुचिता खोब्रागडे, प्रा. अश्विनी सातपुडके, प्रा. वनिता हलकरे, ग्रंथपाल शमिना अली, शिक्षकेत्तर कर्मचारी चंदन जगताप, मोरेश्वर गाऊत्रे, विजय बाळबुद्धे आदींनी लीना हिचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या यशाबाबत परिसरातून कौतूक होत आहे.

हे देखील वाचा:

जत्रा मैदानजवळ आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

वसंत जिनिंगचा उद्या शेतकरी मंदिरात शेतकरी सभासद मेळावा

Comments are closed.