गळफास घेऊन 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या

सातत्याने होणा-या आत्महत्या ठरतोय चिंतेचा विषय

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वांजरी गावातील एक 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ओंकार किशोर लडके (18) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यानंतर आता वणी तालुक्यातही आत्महत्येचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ओंकार हा वांजरी येथील रहिवासी होतो. शुक्रवारी दिनांक 17 मे रोजी तो गावातच होता. मात्र 5 वाजताच्या सुमारास तो घरी गेला. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ओंकारचे मोठे वडील घरातील पहिल्या माळ्यावर गेले. तेव्हा त्यांना ओंकारने छतावरील सिलिंग फॅनला दुपट्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले.

घटना उघडकीस येताच त्याला सुरवातीला वणीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओंकारच्या पश्चात आई,वडील व एक 13 वर्षीय बहीण आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

Comments are closed.