महिलांचे कार्यक्षेत्र आता आकाशाएवढे- मंजिरी दामले

लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचा लायन्स हायस्कूल येथे महिलादिन साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या यशाच्या कक्षा वाढत आहेत. महिलांचे कार्यक्षेत्र हे आकाशाएवढे झाले आहे. असे प्रतिपादन लायन्स क्लबच्या पदाधिकारी मंजिरी दामले यांनी केले. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टने लायन्स हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना दामले म्हणाल्यात की, जिच्या हाती पाळण्याची दोरी असते ती जगाचा उद्धार करते. खऱ्या अर्थाने मुलींसाठी शिक्षणाची दारे उघड्या करणाऱ्या क्रांतज्योती सावित्रीआई फुले, छत्रपती शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबच्या महिला पदाधिकारी ललिता बोदकुरवार होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून लायन्स क्लबच्या महिला पदाधिकारी मंजिरी दामले, सुनीता खुगंर, वीणा खोब्रागडे व प्राचार्या चित्रा देशपांडे तथा ज्येष्ठ शिक्षक रवींद्रनाथ लिचोडे व्यासपीठावर उपस्थित होते.

महिला दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांना, प्राचार्या चित्रा देशपांडे, शिक्षिकावृंद तसेच महिला, इतर कर्मचारीवृंद यांना त्यांच्या गुणरूपांवरून शीर्षक देण्यात आलीत. त्याचप्रमाणे लायन्स क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांना व महिला शिक्षकेतर कर्मचारी वर्गांना अल्पशी भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर्ग सात ‘ब’च्या विद्यार्थ्याने नृत्य सादर करून जागतिक महिला दिनावर आपले विचार व्यक्त केलेत.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी जिया हरणखेडे व वैष्णवी निमकर यांनी केले. तर आभार विद्यार्थी स्वयंम भोयर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वर्ग सात च्या वर्गशिक्षिका शिबानी दास व सर्व शिक्षक, शिक्षिकावृंद व इतर कर्मचारी यांनी अथक असे परिश्रम घेतलेत. ज्येष्ठ शिक्षक रवींद्रनाथ लिचोडे यांनी महिला कशा सक्षम आहेत, हे उदाहरणाने पटवून दिले.

यावेळी मंजिरी दामले यांनी स्वरचित कवितेतून स्त्रीचे कार्यक्षेत्र विशाल असून स्त्री ही फार मोठी शक्ती आहे असे पटवून दिले. त्याचप्रमाणे सुनीता खुंगर, वीणा खोब्रागडे, ललिता बोदकुरवार यांनी स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून ती सक्षम आहे असे मत प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कुमारी जिया हरणखेडे व कुमारी वैष्णवी निमकर तर आभार विद्यार्थी स्वयंम भोयर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वर्ग सातच्या वर्गशिक्षिकाशि बानी दास व सर्व शिक्षक, शिक्षिका वृंद व इतर इतर कर्मचारी यांनी अथक असे परिश्रम घेतले.

Comments are closed.