बहुगुणी डेस्क, वणी: संजय खाडे फाउंडेशन संचालित स्व. रामचंद्र खाडे स्मृतीशेष महात्मा फुले अभ्यासिकेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमाला अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संजय खाडे व वैभव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर ईश्वर खाडे व धनंजय खाडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना संजय खाडे म्हणाले, “महात्मा फुले यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित करून समाजाला नवा मार्ग दाखवला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षणाच्या बळावर समाजातील विषमता दूर करण्यासाठी पुढे यावे.” तसेच वैभव ठाकरे यांनी सांगितले, “फुले यांनी स्त्री-शिक्षणाला दिलेले महत्त्व आजही तितकेच प्रेरणादायी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करावा. फुले यांचे विचार हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत.”
यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Comments are closed.