जेसीआय वणी तर्फे लोटी महाविद्यालयात महिला दिन साजरा

विविध कार्यक्रमांचे आयोजन, विद्यार्थीनींना दिले आत्मरक्षणाचे धडे

बहुगुणी डेस्क, वणी: जेसीआय वणी सिटी व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोटी महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांच्या हक्क व समानतेबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या चित्राला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्यासह प्रा. नीलिमा दवणे, अंजली आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. नीलिमा दवणे व अंजली आत्राम यांनी महिला सशक्तीकरणावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शिवानंदच्या चमूनी उपस्थीत विद्यार्थीनींना आत्मरक्षणाचे धडे दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यकर्माला 300 पेक्षा अधिक विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय अध्यक्ष जेसी अभिषेक चौधरी, सचिव जेसी जयंत पांडे, प्रकल्प संचालिका जेसी तनुश्री पांडे, कोषाध्यक्ष नमीष काळे,  उपाध्यक्ष भूषण कोंडावार, जेसी साहिल वासेकर यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.