तब्बल दोन दिवस मृतदेह होता झाडाला लटकून

बेलोरा येथील घटना, शुक्रवारी उघडकीस आली घटना

2

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलोरा येथे एका इसमाचा मृतदेह आढळला. वेकोलिच्या डम्पिंग परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अनंत किसन बेलेकर (42) असे मृतकाचे नाव आहे. तो साखरा (दरा) येथील रहिवाशी होता. बुधवारी रात्रीपासून तो त्याच्या नातेवाईकाच्या घरातून बेपत्ता होता.

प्राप्त माहिती नुसार मृतक अनंत किसन बेलेकर (42) याला व्यसन होते. त्यातून त्याच्या घरी त्याचे कुटुंबीयाशी सारखे वाद व्हायचे. या वादाला कंटाळून तो बुधवारी बेलोरा येथील त्याच्या मामाच्या घरी गेला होता. मामाच्या घरी जेवण झाल्यावर घरचे सर्व झोपी गेले. मात्र अनंतला झोप येत नव्हती. त्यामुळे तो घराबाहेर पडला, तो परत आलाच नाही.

अनंता घरी परत न आल्याने मामाचे कुटुंबीय चिंतेत आले. त्यांनी जवळच्या व्यक्तींजवळ विचारपूसही करून बघितली. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अनंताचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने तो घराबाहेर निघून गेला असावा असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बेलोरा वेकोलिच्या डम्पिंग परिसरातील एका लिंबाच्या झाडाला अनंताच्या मृतदेह आढळून आला.

घरून निघून गेल्यावरच त्याने त्याच दिवशी अनंतने जीवनयात्रा संपवली असा प्राथमिक बांधला जात आहे. घटनास्थळी फारसे कुणी फिरकत नसल्याने दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली. दरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या मोबाईलवरून अनंताची ओळख पटली. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे देखील वाचा:

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

चारगाव चौकी येथे 11 लाखांची अवैध दारु जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.