58 वर्षांपासून मांडवा गट ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही

लोक सहभागातून ग्रामपंचायत कार्यालयाची निर्मिती

0

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी या आदिवासी बहुल तालुक्यातील मांडवा गट ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ साली झाली. ५८ वर्ष होउन सुध्दा या ग्रामपंचायतीला हक्काचे कार्यालय नाही. अनेक वर्षापासून वारंवार इमारतीसाठी मागणी करुन सुद्धा इमारत बांधुन न मिळाल्यामुळे लोक सहभागातून ताटव्याची इमारत उभी करण्यात आली आहे.

झरी पासून पश्चिमेला सात किलोमीटर अंतरावर मांडवा ग्रामपंचायत आहे. ह्या ग्रामपंचायत अंतर्गत मांडवा, महादापुर, कोडपाखिंडी ही तीन गावे येत असून ही ग्रामपंचायत पेसा मध्ये येते. व ह्या गावात उन्हाळ्याची सुरुवात होताच नेहमी पाणी टंचाई भासते. या ग्राम पंचायतचे सरपंच अंजना अय्या टेकाम, उपसरपंच मनीषाहरी राऊत, सदस्य बापूराव अय्या टेकाम, किरण श्रावण माडावी, वृंदा भीमराव मडावी, सुशीला बंडु कुमरे, सुदर्शन मडावी असे एकूण सात सद्स्यांची ग्रामपंचायत आहे.

ग्रामपंचायत सद्स्यानी व गावातील नागरिकानी अनेक वर्षापासुन शासनाकडे इमारती साठी वारंवार मागणी केली पण त्यांच्या मागणीला निवेदनाची केराची टोपली दाखविली गेली. त्यामुळे गावातील गंगाधर आत्राम, घुलाराम दडांजे, चंद्रकला इरले, सुनील दडांजे, अय्या आत्राम, शंकर नैताम  नरसिंग  मारचेट्टीवार,  बापुराव टेकाम, नारायण टेकाम, अजित जुमनाके, शंकर आकुलवार,  रमेश आत्राम, शामराव आकुलवार व  गावातील इतर लोकानी मिळुन शासनाच्या कार्यप्रणाली वर निंबु टिचुन तीन दिवसापुर्वीच लोक सहभागातून ताटवे व टिनपत्रे टाकुन इमारत उभी केली.

इमारत नसल्याने येथे जुने ग्रामपंचायत चे रेकार्ड आहे कि नाही ह्यात सुद्धा शंकाच आहे. आतातरी प्रशासन ह्या ग्रामपंचायत कडे लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.