बहुगुणी डेस्क, वणी: उधारीच्या पैशातून वाद झाल्याने दोन भावांनी एकाला बेदम मारहाण केली. सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास रंगारीपु-यात ही घटना घडली. या प्रकरणी दोन भावांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी गणेश तुळशीराम नागपुरे (वय 35) हे वणीतील मच्छी मार्केट परिसरातील रहिवासी आहे. त्यांचे आरोपी अथर्व येरणे (वय 33) व यश येरणे (वय अंदाजे 22) दोघेही राहणार रंगारीपुरा यांच्याकडे काही पैसे आहे. पैसे देण्यास दोघेही भाऊ टाळाटाळ करीत होते. त्यामुळे गणेश हे सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास उधारी मागण्यासाठी दोघांच्या घरी गेले. दरम्यान तिथे दोन्ही भावांनी गणेशची वाद घातला. वाद वाढून अथर्व व यश यांनी गणेशला शिविगाळ करीत मारहाण केली.
या मारहाणीत गणेश यांचे तोंड फुटले व त्यांच्या चेहऱ्यावरून रक्तस्त्राव झाला आहे. यावेळी आरोपींनी “तुझे पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर” अशी धमकी दिली. अखेर गणेश यांनी वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत दोन्ही भावांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस नाईक विशाल राठोड करीत आहे.



Comments are closed.