बहुगुणी डेस्क, वणी: विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव लवकरच सुरू होत आहे. संपूर्ण विश्वात याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोबतच जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरूच आहेत. हे दोन्ही उपक्रम मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने ‘उत्सव स्त्रित्वाचा..! ध्यास समानतेचा…!!’ या शीर्षकाखाली 12 व 13 एप्रिलला मारेगावात होत आहेत.
विदर्भस्तरीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा 18 वर्षांवरील महिलांसाठी आहे. पारंपरिक वेशभूषा’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 12 एप्रिलला सकाळी 11.00 वाजता शेतकरी सुविधा केंद्रात होईल. विदर्भस्तरीय सामूहिक आणि एकल नृत्यस्पर्धा12 एप्रिलला सकाळी 11.00 वाजता होईल.13 एप्रिल सायंकाळी 5.00 वाजता 30 वर्षांवरील वयोगटाच्या महिला करीता नृत्यस्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे. ही मारेगावच्या स्पर्धा वसंत जिनिंगच्या पटांगणवर होईल.
रविवारी दिनांक 13 एप्रिल सायंकाळी 4.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली प्रारंभ होईल. ही रॅली शहरातील मुख्य मार्गक्रमण करीत परत चौकात येईल. रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा देखावा सादर केला जाणार आहे. तसेच ढोल ताशांच्या गजरात विविध नृत्य व आदिवासी डंडार नृत्य सादर केले जातील.
विविध स्पर्धांतील प्रवेशांसाठी प्रतिभा डाखरे (9922669648), बीना दुपारे हेपट (9356035463), मयूरी जैस्वाल (7066006684) यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजक दीपक जुनेजा यांनी केली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बिना हेपट (दुपारे), प्रतिभा डाखरे, उदय रायपुरे, गणेश पावशरे, किशोर पाटील, गजानन जयस्वाल, शहाबुद्दीन अजानी आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहे.
Comments are closed.