मार्की ग्रामपंचायतमधील घोटाळ्याची होणार चौकशी

बांधकाम व बोगस मजूर दाखवून लाखोंची उचल

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु.) येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांत मोठा घोटाळा झाल्याचे माहितीच्या अधिकारात निष्पन्न झाले. सदर माहिती जयंत उदकवार यांनी प्राप्त करून हा घोटाळा पुढे आणला. आता या घोटाळ्याची चौकशी होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. .

शासनाच्या योजना ग्रामपंचायत सामान्य आणि गरजू व्यक्तीपयंर्त पोहोचवित नाही. सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांच्या भोंगळ कारभारामुळे शासनाच्या सर्व योजना फक्त कागदावरच मर्यादित आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्या जवळील व्यक्तीच्या नावाने पैसे उचलल्या गेले.

माहिती अधिकारात ग्रामपंचायत शिपाई यांच्या मासिक पगारासोबत अनेक रकमा उचलल्या गेल्याचे आढळले आहे. ग्रामपंचायतच्या आजपर्यत नाल्याच उपसल्या नाही. त्यांच्या नावानेच पैसे काढले आहे. नालीसफाईसाठी एकूण १ लाख ८३ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला. ग्रामपंचायतने एका महिन्यामध्ये अनेकदा नाली उपसण्याचे काम रेकॉर्डला दाखऊन पैसे काढले आहे. .

गावातील नाली सफाई वर्षातून एकदा रमेश नैताम आणि त्यांची टीम करते, हे गावातील सर्व लोकांना माहिती आहे. परंतु नाली सफाईचे पैसे दुसऱ्याच लोकांनी उचलल्याचे पुढे आले आहे. ज्या लोकांच्या नावाने पैसा उचल करण्यात आला आहे, त्या लोकांनी आम्हाला पैसा मिळाला नाही व आम्ही कामही केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायतने मागील वर्षात कोणत्याच प्रकारचे बांधकाम केले नाही, परंतु बांधकाम व इतर मजुरी या विषयाला अनुसरून एकूण ५ लाख रुपये अप्रत्यक्षरीत्या उचलले आहे. या सर्व गैरप्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उदकवार यांनी देताच प्रशासन खडबडून जागे झाले. .

तक्रारीची दखल घेत विस्तार अधिकारी एस. जे. इसळकर यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सचिव, सरपंच, उपसरपंचांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. सदर चौकशीकरिता गावातील जनतेने सुद्धा हजर राहून ग्रामपंचायतीला विकासकामाकरिता आलेला निधीचा वापर कोणत्या प्रकारे करायचा असतो, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनीदेखील उपस्थित रहावे, असे आवाहन जयंत उदकवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.