जितेंद्र कोठारी, वणी : अगदी धूमधडाक्यात व सामाजिक रीतीरिवाजा प्रमाणे तिचा विवाह मे 2009 मध्ये पार पडला. सुखी भविष्याचे स्वप्न बाळगून ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे सासरी गेली. काही दिवस पती, सासू – सासऱ्यासह सासरकडील लोकांनी तिला प्रेमाची वागणूक दिली. मात्र लग्नाला एक वर्ष होत नाही तर नवऱ्यासह सासू सासऱ्यानी हुंड्यासाठी तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती दारू पिऊन मारझोड करायला लागला. दरम्यान तिला एक मुलगीही जन्माला आली.
सासरकडील मंडळींचा त्रास सहन होत नसल्याने अखेर ती माहेरी वडिलांकडे राहायला आली. तसेच पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी सासरकडील मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची तक्रार दिली. कौटुंबिक वाद असल्याने पोलिसांनी सदर प्रकरण महिला सेल पांढरकवडा येथे पाठविले. महिला सेलमध्ये दोघांची काऊंसलिंग करण्यात आली. परंतु दोघांमध्ये तडजोड न झाल्याने अखेर पिडीत महिलेने 24 जून 2023 रोजी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पती विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास तसेच दिल्याची तसेच सासू, सासरा, भासरा, जावू, दिर व दिराची पत्नी तिच्या पतीला त्रास देण्यासाठी भडकवत असल्याची तक्रार दाखल केली.
पिडीत महिला मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात वडिलांकडे वास्तव्यास आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी पती विलास ज्ञानबा सातघरे, सासरे ज्ञानबा नारायण सातघरे , सासू कौशल्याबाई ज्ञानबा सातघरे, भासरा अनिल ज्ञानबा सातघरे, जावू निताबाई अनिल सातघरे, दिर अरविंद ज्ञानबा सातघरे व जावू सोनीबाई अरविंद सातघरे सर्व रा.घाटी, ता. घांटजी, जि. यवतमाळ विरुद्ध कलम 34, 498 (A) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
Comments are closed.