विमा अभिकर्त्या शोभा राऊत यांना प्रतिष्ठित MDRT बहुमान
भारतीय जीवन विमा निगमचे क्षेत्रीय प्रबंधक तर्फे सत्कार
जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC) वणी शाखेच्या विमा अभिकर्त्या शोभा निरंजन राऊत (0081799K) यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. भारतीय जीवन विमा निगमच्या वणी शाखेत वर्ष 2023 साठी MDRT होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे. वणी येथे भारतीय जीवन विमा निगमच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त व नवीन कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा व गुजरात झोन प्रबंधक बी.एस.मिश्रा यांच्यातर्फे शोभा राऊत यांचा पुष्पगुच्छ व रजत पदक देऊन सत्कार करण्यात आला.
आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. यावर्षी MDRT 2023 चे सेमिनार अमेरिकेतील नैशविले शहरात होणार आहे. या जागतिक संमेलनात सहभागी होण्याची संधी शोभा राऊत यांना मिळाली आहे.
MDRT हा बहुमान मिळण्यासाठी विमाअभिकर्ता यांना वर्षभरासाठी व्यवसायाचे टारगेट दिले जाते. ग्रामीण भागातून विमा व्यवसाय करीत महिला विमा प्रतिनिधी शोभा राऊत यांनी MDRT बहुमान मिळविल्याबद्दल कौतुक केले जात आहे. देशभरात एलआय सी चे 13 लाख विमा प्रतिनिधी आहेत त्यापैकी 2 ते 3 हजार प्रतिनिधी यासाठी पात्र होतात.
कार्यक्रमात पश्चिम झोन प्रबंधक बी.एस.मिश्रा, पश्चिम क्षेत्र अभियंता एस.एम.श्रीवास्तव, अमरावती विभागीय व्यवस्थापक यु.सी. मलिक, मार्केटिंग मॅनेजर लहाने, सेल्स मॅनेजर विश्वनाथ धोंगडे, वणी शाखा व्यवस्थापक प्रकाश झलके, पांढरकवडा सॅटेलाईट ब्रांच मॅनेजर कृष्णा खंडारे, अति. शाखाधिकारी वणी योगेश रणदिवे, विकास अधिकारी हेमंत टिपले आदींनी MDRT बहुमान मिळविल्याबद्दल शोभा राऊत यांचे अभिनंदन केले आहे.
शोभा राऊत यांनी आपल्या यशाचे श्रेय शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी हेमंत टिपले व एलआयसी वर प्रेम करणा-या असंख्य विमाधारकांना दिले आहे.
Comments are closed.