विवेक तोटेवार, वणी: वणीतील गौहत्या प्रकरणाची दखल महाराष्ट्र गोसेवा आयोगाने घेतली आहे. दिनांक 20 जानेवारी रोजी गोसेवा आयोगाच्या सदस्यांनी वणीत भेट देत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या प्रकऱणाची जिल्हाधिकारी यांना संपूर्ण माहिती देण्यात आली असून आज मंगळवारी पोलीस अधिकारी व मुख्याधिकारी यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. दरम्यान समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली असता तिथे अद्यापही शेकडो गोवंशाचे सांगाडे पडून आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोहत्या होत असताना पोलीस प्रशासन काय करीत होते, असा प्रश्न आता सर्वच विचारू लागले आहेत.
दिनांक 11 जानेवारी रोजी वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात दोन गायींचे शिर रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर एका झोपडीत शेकडो जनावरांचे शिर आढळून आले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गोहत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणी सकल हिंदू समाज संघटना आक्रमक झाल्यात. दरम्यान या प्रकरणाची दखल राज्य गोसेवा आयोगाने घेतली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. यात शेगाव येथील उद्धव नेरकर, औरंगाबाद येथील मनीष वर्मा, वणी येथील ऍड आतिश कटारीय व पशू संवर्धन उपायुक्त यवतमाळ यांचा समावेश आहे.
वणीच्या शासकीय विश्रामगृह येथे आयोगाच्या सदस्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांची बैठक घेतली. त्यानंतर अनेक संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत निवेदन दिले. या संघटनांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री राम नवमी उत्सव समिती, जैन समाज संघटना व पशु संवर्धन समिती इत्यादी संघटनांचा समावेश आहे.
अद्यापही गोवंशाचे सांगाडे जैसे थे
संघटनाच्या सदस्यांनी आयोगाच्या सदस्यांना घटनास्थळी भेट देण्याची विनंती केल्यावर आयोगाच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणी गौवंशाची हाडे जागोजागी विखुरलेले होती. अनेक ठिकाणी चामडे पडलेले होते. दुर्गंधी येत होती व गौवंशाचे शिराचे हाडे पडलेली होती. या ठिकाणी पाहणी करून संघटनाच्या लोकांनी त्या ठिकाणी विखुरलेले जनावरांच्या कानाला लावण्यात आलेले आधार कार्ड मिळाले. ते समितीच्या सदस्यांनी जमा करून घेतले. तेथून अनेक सँपल जमा करून आरोपींवर कलम 11 (ध) या कलम नुसार कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
Comments are closed.