निराधार असलेल्या तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मार्डी येथील घटना.. लहानपणी आईवडील गमावले, मोेठे झाल्यावर दोन्ही भाऊ, एकटेपणाला कंटाळून निवडला आत्महत्येचा पर्याय.

भास्कर राऊत मारेगाव: लहाणपणी त्याने आईवडील गमावले. मोठा झाल्यावर आजारात त्याचे दोन्ही भाऊ मरण पावले. त्याच्या बोलण्यातही थोडेसे व्यंग. ना कुणाचा सहारा ना कुणाचे प्रेम ना कुणाची माया. यामुळे एकाकी दिवस काढत जगणा-या तरुणाने अखेर आत्महत्येचे माध्यमातून मृत्यूला जवळ केले. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील मार्डी येथे गुरुवार 21 जाने. रोजी सकाळी उघडकीस आली असून मनोज प्रभाकर खोके (36) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मनोजचे आईवडील लहानपणीच मरण पावले होते. तर तीन भावांपैकी मनोजचे दोन भाऊसुद्धा वेगवेगळ्या आजाराजे मरण पावले. थोडासा घेंघाणा असलेला मनोज हा मार्डी ग्रामपंचायतमध्ये साफसफाईचे कामे करायचा. एकटा असलेला मनोज जीवनाला कंटाळला होता. बुधवार 20 जानेवारी रोजी दुपारी तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गावाशेजारी असलेल्या विहिरीकडे गेला होता. तेथे विहिरीवर तो बसला होता. परंतु शेजारील शेतकर्‍यांनी त्याला हटकले. त्यामुळे तो परत घराकडे निघाला.

रात्रीच्यावेळेस मनोज पुन्हा त्या विहिरीवर गेला आणि विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. घटनेबाबत मारेगाव पोलिसांना सूचना देण्यात आली असून मृतक मनोज यांचे प्रेत विहिरीतून काढून पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाथी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे. 

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते
मनोज खोके यांनी केलेल्या आत्महत्येच्या निमित्ताने कवि सुरेश भट यांच्या गझलेतील ‘इतुकेच मला जाताना सरनावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. हा शेर तंतोतत खरा उतरला आहे.

 

Comments are closed.