10 वी त शिकणा-या विद्यार्थीनीला फूस लावून पळवले

वणी तालुक्यातील घटना, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: 10 वर्गात शिकणा-या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 24 जून रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता ही 16 वर्षांची असून ती 10 वर्गात शिकते. ती तिचे आई, वडलांसह तालुक्यातील एका गावात राहते. तिचे आई वडील मजुरी करतात. सोमवारी दिनांक 24 जून रोजी सकाळी पीडितेचे आईवडील कामासाठी घरून निघाले. संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान ते घरी परतले असता त्यांना घराला कुलून लावून दिसले.

त्यांनी शेजा-याला मुलीबद्दल विचारणा केली. दुपारी त्यांची मुलगी एक बॅग घेऊन घराबाहेर गेल्याची माहिती शेजा-यांनी दिली. मुलीच्या पालकांनी शेजारी, नातेवाईक व मुलीच्या मैत्रिणींकडे विचारणा केली मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मुलीला कुणीतर फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. त्यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.