सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंधीवाढोना येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याता आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहिती नुसार दसरा सणानिमित्त गावतील एक 12 वर्षीय मुलगी आपल्या समवस्क मैत्रिणी सोबत 18 ऑक्टोबरला 4.30 वाजताच्या दरम्यान पूजे करिता झंडूचे फूल आणण्याकरिता गेली होती. त्यावेळी आरोपी राजू पंधरे हा तिथेच होता. फूल तिथे नसून दुसरीकडे असल्याचे सांगून तो मुलीला दुस-या ठिकाणी घेऊन गेला.
तिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मुलीने घाबरून तिथून पळ काढला व आपल्या मैत्रिणीला घेऊन घरी रडत परत आली. घाबरलेल्या मुलीला घरच्या लोकांनी विचारले असता मुलीने सदर घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यावरून 18 ऑक्टोबरला सायंकाळी मुलीला घेऊन मुकुटबन पोलीस स्टेशनला आरोपी राजू आत्माराम पंधरे वय ३० वर्ष याच्याविरुद्ध मुलीच्या वडिलांनी लेखी तक्रार दिली.
यावरून गावतीलच राहणारा आरोपी राजू पंधरे विरुद्ध भादवी कलम 354 सह बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार व शशिकांत नागरगोजे करीत आहे.