महाराष्ट्र बंदला वणीत संमिश्र प्रतिसाद

शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेते उतरले रस्त्यावर, माकप व किसान सभेचे वणीत निदर्शने

जितेंद्र कोठारी, वणी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले होते. मात्र वणीमध्ये आजच्या राज्यव्यापी बंदचे संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाले. दरम्यान दुकाने बंद करण्यावरून आंदोलक आणि काही व्यापा-यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते.

लखीमपूर खिरी प्रकरणाचे निषेध व बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेतेमंडळी सकाळी 10 वाजता दरम्यान टिळकचौक येथे जमा झाले. मात्र तोपर्यंत शहरातील बहुतांश दुकाने उघडली होती. बंदचे आवाहन करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये महणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते.

महाविकास आघाडी नेत्यानी व्यापाऱ्याना दुकाने बंद करून सहकार्य करण्याची विनंती केली. काही दुकानदारांनी स्वस्फूर्त दुकाने बंद केली, तर काही व्यापाऱ्यानी मोर्चा पुढे जाताच परत आपली दुकाने उघडली. दरम्यान गांधीचौक येथे दुकाने बंद करण्याचा आवाहन करताना काही दुकानदार आणि मोर्चेकऱ्यात वाद उत्पन्न झाला. पोलिसानी वेळेवर वाद मिटवून परिस्थिति कायम ठेवली.

राजव्यापी बंद आंदोलनात शिवसेनेचे संजय देरकर, सुनील कातकडे, दीपक कोकास, गणपत लेडांगे, राजू तुराणकार, विक्रांत चचडा, अजिंक्य शेंडे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रो. अशोक जीवतोडे, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, शहर महिला अध्यक्ष सविता ठेपाले, विजयाताई आगबत्तलवार, आशा टोंगे, प्रतिमा वंजारी, सोनाली मडावी, वैशाली तायडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एड. देवीदास काळे, टीकाराम कोंगरे, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराना, ओम ठाकुर, मोरेश्वर पावड़े, विवेक मांडवकर, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, प्रवीण खानझोडे इत्यादी उपस्थित होते.

किसानसभेतर्फे जोरदार निदर्शने
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात येऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ह्या आंदोलनात कॉ. शंकरराव दानव, कॉ. दिलीप परचाके, कवडू चांदेकर, वंचित चे मंगल तेलंग, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, आनंदराव पानघाटे, किशोर मून व अन्य अनेक गावातील माकप व किसान सभेचा असंख्य कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता.

हे देखील वाचा:

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.