विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मनसे वाहतूक सेनेचा पुढाकार

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहोर्ली, विरकुंड, बोर्डा येथील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या शैक्षणिक नुकसान पाहता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पदाधिकाऱ्यांनी वणी आगार प्रमुख यांची भेट घेऊन या मार्गावर बस सेवा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी पालकांकडून वारंवार मागणी करूनही कानाडोळा करणाऱ्या आगार प्रमुख यांना मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांची चांगलेच धारेवर धरले.

तालुक्यातील मोहोर्ली, विरकुंड, बोर्डा येथून दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वणीला येतात. मात्र राज्य परिवहन निगमच्या वणी आगाराच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावर नियमित बस फेऱ्या चालविली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने ये जा करावा लागते. किंवा शाळेत गैरहजर राहावं लागते. याबाबत अनेकदा मागणी करुनही एस टी अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी विद्यार्थी व पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांची भेट घेऊन समस्या मांडली.

इरशाद खान यांनी पालक तसेच विद्यार्थ्यांसह एस.टी. महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाची भेट घेऊन शाळेच्या वेळेवर बस फेरी चालू करुन द्यावी, अशी मागणी केली. तसेच एसटी महामंडळाच्या वतीने जर बस सेवा चालवण्यास दिरंगाई होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मनसे नेता राजु उंबरकर यांच्या आदेशाने एसटी महामंडळाचा कारभार हाती घेण्यास सक्षम आहे. अशी तंबी सुद्धा यावेळी इरशाद खान यांनी आगार प्रमुखांना दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावर आगार प्रमुखांनी लगेच प्रतिसाद देत बस फेऱ्या शाळेच्या वेळेवर होईल, असे आश्वासन दिले. आगार प्रमुखांनी दिलेल्या शब्दामुळे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांचे आभार मानले. यावेळी मनसे वाहतूक सेनेचे वणी विधानसभा अध्यक्ष शम्स सिद्दीकी, मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे, वाहतूक सेनेचे शहर उपाध्यक्ष अयाज पठाण, लकी सोमकूवर तसेच वाहतूक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.