वेकोलि परिसरात वाघाची दहशत… मनसेचे ‘वाघ’ उतरले रस्त्यावर
मुसळधार पावसात आंदोलन, प्रशासनाने दिले कार्यवाहीचे आश्वासन...
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वाघाच्या वाढत्या दहशतीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. निळापूर-गोवारी परिसरात वाघांच्या वावरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी निळापूर गावाजवळ तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत वेकोली आणि वन विभागाने नागरिकांच्या मागण्यांना मान्यता देत तात्काळ उपाययोजना राबवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी मनसेने प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. मात्र यावर कोणतीही कारवाई न झाल्याने, मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली 11 सप्टेंबर 2025 रोजी हे आंदोलन आयोजित करण्यात आले. मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन चालले, यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या तीव्र प्रतिक्रियेमुळे वेकोली आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी हजर राहावे लागले.
वाघाचा बंदोबस्त कार, झाडे-झुडपे साफ करा, रस्त्याची दुरुस्ती, अवजड वाहतूक नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण इत्यादी प्रमुख मागण्या आंदोलकांच्या होत्या. आंदोलनाला वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक घरडे आणि वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक व्हि. के. धुमाळे यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्याचे आश्वासन दिले, तर वाघाच्या बंदोबस्तासाठी वनरक्षकांची गस्त वाढवण्याचे मान्य केले. तसेच, झाडे काढणे, अवजड वाहतूक थांबवणे आणि प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात मनसेचे प्रवीण कळसकर, गोवर्धन पिदुरकर, योगेश काळे, प्रवीण मांडवकर, शिरीष भवरे, राजू काळे, विशाल असुटकर, मंगेश चिंचोलकर, उज्वला चिंचोलकर, प्रवीण चटप, बंडू आवारी, महेश कळसकर, योगिता चिंचोलकर, सारिका चटप, दर्शना कळसकर, पुष्पा ठाकरे, शुभांगी कळसकर, दिगंबर चटप, संजय चिंचोलकर, योगेश कळसकर, रवी ठाकरे, पुष्पा वासेकर, अर्चना कळसकर, मालन हेकाल, सुरेखा खामणकर, आनंद कळसकर, मनोज बोधे, अमोल पाल, लक्ष्मण उपरे, सूरज काकडे, धीरज बगवा, सूरज लोढे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Comments are closed.