दारू अड्ड्यावर धाड टाकणा-या मनसेच्या रणरागिणींचा सत्कार
वनोजा येथील अड्डा नष्ट करणा-यांचा राजू उंबरकर यांनी केला सन्मान
विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गोंडबुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून तेथून दारू नष्ट केली. या दारू विक्रीविरोधात धाडसी पाऊल उचलल्याने मनसेचे राजू उंबरकर यांनी या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले.
सत्कार समारंभाला अर्चना सोनटक्के, सिंधु सोनटक्के, वनिता – ढोके, माया कडूकर, लता लखमापुरे, इंदिरा सोनटक्के, सुनीता सोनटक्के माया ढोके, सोनू काळे, सुनंदा राजुरकर, सुनीता सोनटक्के, सीमा शिंदे, मंजूषा ढोके, माला श्रीरसागर, उज्ज्वला बरडे, अनुसया शेळमाके, शांताबाई आत्राम, नंदा पोळाळकर, शोभा शेळमाके, कांता शेंदरे, मीना जुमनाके व मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव महिला मनसेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनखेडे, मनसेचे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, नवी शेख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारेगाव तालुक्यातील वानोजा येथे गेल्या काही काळापासून अवैध दारू विक्री सुरू होती. या अवैध दारू विक्री संदर्भात गावकरी त्रस्त झाले होते. गावकरी महिलांनी मनसेच्या तालुका अध्यक्ष व इतर महिलांशी संपर्क केला. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन सदर दारू पकडली ते दारू तिथेच नष्ट केली. या कारवाईदरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू पकडून ती स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिली.
Comments are closed.