बहुगुणी डेस्क, वणी: संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्थान म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दिनांक 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी तालुक्यातील मोहदा येथील शिव महोत्सव समिती तथा संभाजी ब्रिगेडने जय्यत तयारी सुरू केली आहे. या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोहदा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमांमध्ये बुधवार दिनांक 19 फेब्रुवारीला सकाळी ६ ते ८ या वेळेत ग्रामस्वच्छता मोहीम राबविली जाईल. तसेच सायंकाळी ६ ते १० या वेळेत गावात शोभायात्रा निघेल. दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक २० तारखेला सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळावा होईल. त्याचप्रमाणे खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार संजय देरकर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमांमध्ये होईल. यवतमाळ येथील प्रसिद्ध विचारवंत तथा लेखक नंदू तटे यांचे यावेळी व्याख्यान होणार आहे.
त्याचप्रमाणे मोहदा प्रीमिअर लीगचे उद्घाटन होईल. या सर्व उपक्रमांसाठी संभाजी ब्रिगेडचे वणी तालुकाध्यक्ष तथा शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश बोंडे, सचिव अमोल शेलवडे, उपाध्यक्ष वैभव मडावी, सदस्य अमोल पुनवटकर, रमण मेश्राम, रमण कुचनकर, श्रीकांत देठे, विनीत कुचनकर, स्वप्निल बोथले, रूपेश खुसपुरे, आशीष शेलवडे, विशाल कुचनकर, खलील शेख यांसह सर्व ग्रामवासी परिश्रम घेत आहेत.
Comments are closed.