हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मांगलीचा मोहरम (ताजिया) उत्सव

शंभर वर्षांपूर्वीची परंपरा कायम, इतर राज्यातील भाविकही लावतात हजेरी

0

संजय लेडांगे, मुकुटबन: मांगली (हिरापुर) येथील मोहरम(ताजिया) उत्सव गेल्या शंभर वर्षाचा वारसा जपत आजही हिंदू-मुस्लिम समाजाचे एकात्मतेचे प्रतीक ठरत आहेत. मांगली (हिरापूर) मोहरम उत्सव केवळ यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध नाही तर परराज्यातही प्रसिद्ध आहे. 
     
दहा दिवसांच्या मोहरम (ताजिया) उत्सवात परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होतात. या उत्सवात हिंदू-मुस्लिम समाजातील भावीक एकात्मतेने उत्सवात भाग घेतात. अदीलाबाद, गडचिरोली आणि नागपूर अशा शहरातील भाविक आपल्या परिवारासह उत्सवात सहभाग घेतात. दहा दिवस चालणाऱ्या मोहरम उत्सवात ‘सवारी आणि डोला’ यांची प्रतिकृती बनवून नाचवण्याची परंपरा आहेत. यासह अनेक भाविक विविध वेशभूषा करून उत्सवात नाचताना दिसतात. दरम्यान छोटे-मोठे व्यवसायिक आपली दुकाने थाटून उत्सवात सहभागी होतात.  भाविकांची गर्दी पाहता मोहरम उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.

परिसरातील गावागावांतून हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या कडून बोललेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी मोठी रीघ लावतात. मांगली (हिरापुर) मोहरम उत्सवांची शंभर वर्षांपलीकडील परंपरा कायम आहेत. मांगली गावांमध्ये ‘सवारी आणि डोला’ यांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढून पूजाअर्चा करीत मोहरम उत्सव साजरा केला जातो आहेत.

आजही मोहरम उत्सवांची परंपरा जोपासत भव्य अशा देवस्थानच्या मंडपाची देखभाल कमिटी पाहत दरवर्षी मोहरम उत्सव हिन्दू-मुस्लिम समाज एकत्र येऊन केला जातो. यातूनच सायंकाळी मांगली, हिरापुर (नवीन), हिरापूर (जुना) गावातील ‘सवारी आणि डोला’ प्रतिकृती एकत्र ठिकाणी आणून भेटी-गाठी घेण्याची प्रता आहेत. यानंतर उत्सवाची सांगता केली जाते. गेल्या वर्षानुवर्षे पासून साजरा करण्यात येणारा मांगली (हिरापुर) मोहरम उत्सव हिंदू-मुस्लिम समाजाचे एकात्मतेचे प्रतीक ठरला आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.