कोरोनाला घाबरू नका, मी आपल्या सोबत… खासदारांची भावनिक साद

वणी क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेवर खासदारांनी यांनी व्यक्त केली नाराजी

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णात वाढ होत आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारादरम्यानन मृत्यू पावत आहे. परंतु या संकटाला आपण लवकरच हरवू. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगू नका, मी सदैव आपल्या पाठीशी आहे अशी भावनिक साद खासदार बाळू धानोरकर यांनी रुग्णांकडे केली आहे. सोमवारी त्यांनी वणीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी अपुरी आरोग्य सुविधा व नियोजन शून्य असल्याने नाराजी व्यक्त केली.

Podar School 2025

येथील ट्राम केअर सेंटर्स, परसोडा शासकीय निवासी विद्यालय येथील विलगीकरण केंद्र, वेकोलि येथील रुग्णालाय तसेच उपविभागीय कार्यालय येथे अधिकाऱ्यांशी कोरोना संकट काळातील करण्यात येणाऱ्या उपयोजनेवर आढावा घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुज्जलवार, तहसीलदार पांडे, पोलीस निरीक्षक जाधव, ओम ठाकूर, डॉ. विकास कांबळे, डॉ, कमलाकर पोहे, अभियंते शुभम तायडे यांची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आढावा बैठकी दरम्यान त्यांनी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहे. परंतु वणी क्षेत्रात फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. येथे उपजिल्हा रुग्णालय नाही. येथे अस्तित्वात असलेले ट्राम केअर सेंटर मध्ये ६० बेड्स आहे. त्यामध्ये २३ बेड्सचा पाइपलाइन करण्यात आली आहे. त्यासोबतच ३३ सिलेंडर प्राप्त झाले आहे. इतर होणार आहे. परंतु ६० बेड्स लवकर कार्यान्वित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वणी येथून यवतमाळ फार लांब असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वेकोलिच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून खासदार बाळू धानोरकर यांनी २० सिलेंडर त्यांनी दिले परत २० सिलेंडर उपलब्ध करून देणार आहे . १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेस्ट देणार आहे. वेकोलि येथील कोरोना हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली आहे. त्याकडे रेमडेसिव्हिर, फॅबिफ्लू औषध साठा उपलब्ध होणार आहे. त्यासोबाबत हवेतून प्राणवायू गोळा करणारे केंद्र लवकरच उभे करण्यात येत आहे.

तसेच ६० बेड्स कार्यान्वित करण्यासाठी १५० जम्बो सिलेंडरचा नियमित पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. त्यासोबतच वणी नगरपरिषद क्षेत्रात विलगीकरण केंद्र उभे करून रोज दोन वेळच्या जेवणाची नास्ता व चहाची व्यवस्था करण्याच्या लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.